Ad will apear here
Next
‘आयुर्वेदाच्या स्मृतीतून’ पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन
पुणे : वैद्य हरीश पाटणकर यांच्या संकल्पनेतून आणि ‘बीव्हीजी इंडिया’च्या सहकार्याने साकारलेल्या ‘केशायुर्वेद’ या भारतातील पहिल्या आयुर्वेदीय हेअर टेस्टिंग लॅब आणि संशोधन केंद्राच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ‘केशायुर्वेद’च्या राज्यातील तीस उप-केंद्रप्रमुखांचा सत्कार, ‘आयुर्वेदाच्या स्मृतीतून’ या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन, रससिद्ध अरुणकुमार महाराज यांचे पारद किमया प्रयोग आणि ‘असोसिएशन ऑफ आयुर्वेदिक कॉस्मेटॉलॉजी, ट्रायकॉलॉजी अँड टेक्नॉलॉजी’ची स्थापना अशा कार्यक्रमांचा समावेश आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ‘बुकगंगा’चे संस्थापक मंदार जोगळेकर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ‘बीव्हीजी इंडिया’चे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड भूषविणार आहेत. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण जामकर, आयुर्वेद व युनानी विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. सतीश डुंबरे, महाराष्ट्र राज्याच्या आयुष विभागाच्या सहायक संचालक डॉ. सरिता गायकवाड या वेळी उपस्थित राहतील, अशी माहिती ‘केशायुर्वेद’चे संचालक वैद्य हरीश पाटणकर यांनी दिली आहे.

वैद्य हरीश पाटणकर म्हणाले, ‘आरोग्यवर्धिनी चिकित्सालय आणि बीव्हीजी इंडिया यांच्या सहकार्यातून सुरू झालेल्या केशायुर्वेद या भारतातील हेअर टेस्टिंग लॅब आणि संशोधन केंद्राने वर्षभरातच राज्यभर सेवा देण्यास सुरुवात केली आहे. राज्यात सध्या तीस उपकेंद्रे सुरू झाली आहेत. त्याचा लाभ रुग्णांना होत आहे. त्या केंद्रप्रमुखांना प्रोत्साहन म्हणून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. ‘आयुर्वेदाच्या स्मृतीतून’ या पुस्तकात आजार आणि त्यावरील घरगुती उपचारपद्धती सांगितल्या आहेत. सौंदर्याबाबत अलीकडे जागरूकता वाढत असून, त्या दृष्टीने काम सुरू केले आहे. त्यासाठी ‘असोसिएशन ऑफ कॉस्मेटॉलॉजी, ट्रायकॉलॉजी अँड टेक्नोलॉजी’चा फायदा होईल.’

कार्यक्रमाविषयी :
दिवस : बुधवार, १९ जुलै २०१७
वेळ : सायंकाळी चार ते सात
स्थळ : टिळक स्मारक मंदिर, पुणे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZIGBE
Similar Posts
‘केशायुर्वेद’तर्फे आंतरराष्ट्रीय परिसंवाद पुणे : भारतातील पहिले आयुर्वेदीय हेअर टेस्टिंग लॅब अँड रिसर्च सेंटर असलेल्या केशायुर्वेद आणि बीव्हीजी इंडियातर्फे आयुर्वेदावरील पहिल्या आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘आयुर्वेदाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या संधी’ पुणे : ‘युरोपीय देशांसह जगभरात आयुर्वेदाबाबत जागृती वाढत आहे. अनेक देश आयुर्वेदाला मुख्य उपचारपद्धती म्हणून स्वीकारू पाहत आहेत. त्यामुळे आयुर्वेदाला आंतरराष्ट्रीयस्तरावर मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. भारताकडे योग आणि आयुर्वेद निर्यात करण्यासारख्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. संशोधनात्मक आयुर्वेद
‘आयुर्वेदात नाविन्यपूर्ण संशोधन व्हावे’ पुणे : ‘शास्त्रोक्त उपचारपद्धती असलेल्या आयुर्वेदात मोठी क्षमता आहे. मूळव्याध, कर्करोग, वातीचे आजार अशा दुखण्यांवर चार-पाच पिढ्या घरगुती उपचार करणाऱ्या जवळपास तीन लाख लोकांना भेटलो आहे. त्यातील अनेकांच्या उपचाराच्या पद्धती आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत. आपल्याकडे आयुर्वेदात नाविन्यपूर्ण संशोधन झाले, आरोग्य क्षेत्रात मोठी क्रांती होईल
‘आयुर्वेद जागतिक पातळीवर विकसित व्हावा’ पुणे : ‘आयुर्वेद क्षेत्रात बरेच वर्षे काम करत असून, आयुर्वेदाला जागतिक व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आयुर्वेद पोहचविणे आवश्यक आहे. जागतिक पातळीवर आयुर्वेदाला विकसित करण्यासाठी भारतीय आयुर्वेदाचार्यांचा पुढाकार महत्त्वपूर्ण आहे,’ असे मत नेदरलँड येथील प्रेमदानी आयुर्वेदाचे संचालक डॉ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language